अमरावती पोलीस दलातून खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावती शहर पोलीस मुख्यालयात गुरुवारी सकाळी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलील कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयात आयुष्य संपवलं. पोलीस कर्मचार्याच्या निर्णयाने सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील जवानाने गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विजय नागपूरे असे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कार्यालयातून गोळीबाराचा आवाज होताच इतर कर्मचारी धावून गेले. परंतु तोपर्यंत या जवानाचा जीव गेला होता.
शेअर बाजारात झालेल्या नुकसानाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. परंतु अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी कर्मचार्याच्या आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. स्वत:वर गोळ्या झाडल्यानंतर जखमी कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात केलं होतं. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक तपासानंतर पोलीस कर्मचाऱ्याला मृत घोषित केले. पोलीस कर्मचारी विजय नागपूरे यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.