Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking!सांगली :- चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना 36तास उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

Big Breaking!सांगली :- चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना 36 तास उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू


एका बापाने क्रुरपणाची सीमा ओलांडली आहे. चोरी केल्याच्या संशयातून आपल्या दोन्ही मुलींना थेट उलट लटकून ठेवल्याची घटना घडली यात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्याच्या बनपुरी मध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यमगर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला, त्यानंतर संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या दहा व तेरा वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. यामध्ये सारिका यमगारीचा तडफडून मृत्यू झाला आहे.. तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे.मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. दोन्ही त्या चिमुकल्या रात्रभर वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' अशी आर्त हाक देत होत्या. मात्र निर्दयी आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही.
वेदना असह्य झाल्याने सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.