Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळा, कॉलेज बंद; वर्क फ्रॉम होम सुरु...; करोनाप्रमाणे 'लॉकडाउन' लावण्याची वेळ; 'या' देशांमध्ये 'शटडाउन', पाकिस्तानची अवस्था पाहा

शाळा, कॉलेज बंद; वर्क फ्रॉम होम सुरु...; करोनाप्रमाणे 'लॉकडाउन' लावण्याची वेळ; 'या' देशांमध्ये 'शटडाउन', पाकिस्तानची अवस्था पाहा


इराण-इस्रायल युद्धाची झळ आता सर्व देशांना बसू लागली असून, काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने आशियामधील अनेक देशांवर तेलसंकट ओढावलं आहे. याचं कारण याच मार्गाने आशियामधील अनेक देशांमध्ये तेलाचा पुरवठा होतो. दोन्ही देशांमध्ये मागील 26 दिवसांपासून संघर्ष सुरु असताना, अद्यापही हे युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत मिळताना दिसत नाही. यामुळे आशियातील अनेक देशांमध्ये पूर्वकाळजी म्हणून उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भारतात अद्याप तरी चिंताजनक स्थिती नसली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनो काळाप्रमाणे स्थितीचा सामना करावा लागू शकतो असं म्हटलं आहे. भारत सरकार सध्या मिशन मोडवर असून, आजदेखील एक टँकर पोहोचत आहे. पाकिस्तानसह सर्व देशांमध्ये खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे एका देशाने 'राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी' जाहीर केली आहे.

भारतात काय स्थिती?

भारतात अद्याप तरी इंधन संकट निर्माण झालेलं नाही. मात्र अफवा पसरत असल्याने अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर लोक रांगा लावत आहेत. गॅस आणि तेलसंकट निर्माण होणार असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरत आहे आणि त्यांनी स्वत:हूनच ही समजूत करुन घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य सरकारांना साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांना रोखण्यासाठी उपायोजना करण्यास सांगितलं आहे. भारताने ज्या देशांकडून ऊर्जेची आयात केली जाते, अशा देशांची संख्या 27 वरून 41 पर्यंत वाढवली आहे.

पाकिस्तान

तेलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी 4 दिवसच काम करतील अशी घोषण केली आहे. शाळा आणि कॉलेज दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानची जवळपास 90 टक्के तेल आयात अडकून पडली आहे. येथे पेट्रोल-डिझेलचा दर 350 रुपयांपर्यत गेला आहे.

बांगलादेश

तारिक रहमान यांच्या सरकारने इंधनाचा साठा केवळ 9 ते 14 दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याचं सांगितलं आहे. सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले असून, दररोज पाच तासांची वीजकपात लागू करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे.

श्रीलंका

श्रीलंकेत सार्वजनिक सुट्टी अनिवार्य करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी आठवड्याला 15 लीटरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कोणीही अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, याची खात्री करण्यासाठी 'QR-आधारित इंधन पास प्रणाली' कार्यान्वित करण्यात आली आहे.

थायलंड

येथे सार्वजनिक क्षेत्रांमध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्याचे आणि परदेश प्रवास न करण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिएतनाम

येथे रिमोट वर्किंग मॉडलवर विचार केला जात आहे

तैवान

तैवानमध्ये फक्त 11 दिवस पुरेल इतकाच LNG साठा शिल्लक आहे.

इंडोनेशिया

एप्रिलपासून लागू होणाऱ्या हायब्रीड शिक्षण रिमोक वर्किंग मॉडेल बदलाचे मूल्यमापन सध्या सुरू आहे. याबाबत लवकरच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

फिलिपिन्सकडून आणीबाणीची घोषणा

येथे 'राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी' जाहीर करण्यात आली आहे. इंधनाचा साठा 45 दिवस पुरेल इतकाच असल्याचं लोकांना कळवण्यात आलं आहे.

जपान

या देशाने IEA कडे आपल्या साठ्यांमधून पुन्हा एकदा बाजारात तेल सोडण्याची विनंती केली आहे.

दक्षिण कोरिया

हा देश सार्वजनिक संस्थांमध्ये वाहन क्रमांक-आधारित निर्बंध प्रणाली लागू करत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.