सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार आहे. राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय घेतलाय.
महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१ एप्रिलपासून वीज बिल किती आकारले जाणार?
२०२६-२७ या आर्थिक वर्षात ० ते १०० युनीटसाठी ४.३ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ४.७६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे.२०२६-२७ या आर्थिक वर्षात १०१ ते ३०० युनीटसाठी ७.१ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ७.९६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १०.८ टक्के कपात केली आहे.२०२६-२७ या आर्थिक वर्षात ३०१ ते ५०० युनीटसाठी ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १३.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १४ टक्के कपात करण्यात आली आहे.तर, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०० पेक्षा युनीटसाठी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १४.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.