Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाळाला जन्म देऊन आई पळाली, 3 महिने रुग्णालयातील स्टाफने बाळाला सांभाळलं; सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटमधील हृदयस्पर्शी कहाणी

बाळाला जन्म देऊन आई पळाली, 3 महिने रुग्णालयातील स्टाफने बाळाला सांभाळलं; सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटमधील हृदयस्पर्शी कहाणी


सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बाळाला जन्म देऊन आई पळाली. त्यानंतर तब्बल तीन महिने सिव्हिल स्टाफने त्या पुरुष जातीच्या बाळाचा सांभाळ केला. आज हे बाळ पुण्याला पाठवण्याची वेळ आली त्यावेळी सिव्हिलच्या स्टाफने बाळाचे नामकरण केले.

यावेळी आईविना पोरका झालेल्या बाळाचे नाव वीरप्रताप ठेवब्यात आले. शासनाच्या आदेशाने हा तीन महिन्याचा वीरप्रताप पुण्याकडे रवाना झाला. वीरप्रतापला निरोप देताना त्याचा सांभाळ करणाऱ्या स्टाफला रडू कोसळले. सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफकडून हा हृदयस्पर्शी काम केले. 

नेमकं काय घडलं? 

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 26 नोव्हेंबर 2025 रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी त्या बाळाची आई बाळाला सोडून पळून गेली. आईचा शोध घेतला मात्र आढळून आले नाही. त्यातच बाळ शारीरिक दृष्ट्या नाजूक असल्याने त्या बाळाचा सांभाळ तेथीलच स्टाफने करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 15 दिवस बाळाला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. या दरम्यान बाळाला हर्निया झाल्याचेही समोर आले. त्यावर ऑपरेशन सुद्धा करण्यात आले. त्यानंतर आज पर्यंत हे बाळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विशेष नवजात शिशु दक्षता केंद्रातील स्टाफ सांभाळत होते. तब्बल तीन महिने या बाळाचा सांभाळ केलेल्या बाळाला कोर्टाच्या आदेशाने आज पुण्याला पाठवण्यात आले. याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पाठक शिशु केंद्राकडे हे बाळ अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी सुपूर्त केले.

आईविना सांभाळलेल्या विरप्रतापने जाताना मात्र शेकडो आई निर्माण केल्या- 
तत्पूर्वी सिव्हिलच्या सर्व नर्सिंग स्टाफने बाळाच्या नामकरणाची तयारी केली. पाळणा सजवण्यात आला. रांगोळ्या काढण्यात आल्या. फुग्यानी सजावट करण्यात आली. यावेळी या अनाथ बाळासाठी पाळना सुद्धा म्हटलं. यावेळी आईविना पोरका झालेल्या बाळाचे नाव सर्वांनी मिळून वीरप्रताप ठेवण्यात आले. शासनाच्या आदेशाने हा तीन महिन्याचा वीर प्रताप आज पुण्याकडे रवाना होणार होता. त्यामुळे त्याला निरोप देण्यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ एकत्र आला होता. यावेळी तीन महिने सांभाळ केलेल्या बाळाला पाठवताना येथील स्टाफला गहिवरून आले तर काहींना रडू कोसळले. जन्म झाल्यावर आईचे छत्र गेले मात्र सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रत्येक नर्स, डॉक्टरनी या बाळाला तीन महिने आईचे प्रेम देऊन सांभाळ केला. त्यामुळे या यीन महिन्याच्या वीर प्रतापला निरोप देताना अनेकांना अश्रू रोखता आले नाहीत. आईविना सांभाळलेल्या विरप्रतापने जाताना मात्र शेकडो आई निर्माण केल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.