Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिस ठाणे बनलं सभागृह! फुलांच्या माळा, मल्टी लेयर केक, पुण्यात पोलिस निरीक्षकाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

पोलिस ठाणे बनलं सभागृह! फुलांच्या माळा, मल्टी लेयर केक, पुण्यात पोलिस निरीक्षकाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन


पुण्यात एका बाजूला गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे, फरार असलेले कुख्यात गुंड सापडत नाहीत आणि असं असलं तरी दुसऱ्या बाजूला पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे वाढदिवस शब्दशः जल्लोषात केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस संदीप देशमाने यांचा नुकताच वाढदिवस साजरी झाला. यासाठी स्वतः देशमाने यांनी कुठलाच गाजा वाजा केला नाही मात्र पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी साहेबांचा वाढदिवस म्हणून चक्क पोलिस ठाण्यात फुलांची माळ लावून देशमाने यांच्या केबिनला सभागृहाचं रूप दिलं.

देशमाने यांच्या स्वागताला पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी प्रवेशद्वार वर जमले आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं. पुढे सजवलेल्या केबिन मध्ये पोलिस ठाण्याच्या "बॉस" साठी भले मोठे मल्टी लेयर केक सुद्धा आणले गेले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपला वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून अधिकारी व अंमलदार यांनी वैयक्तिक स्तरावर आपले वाढदिवस साजरे करणे आवश्यक आहे. यापुढे पोलिस ठाणे आवारात किंवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येवू नयेत यावर गृह खातं काही ठोस निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पुणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात येत आहेत दुसरीकडे अल्पवयीन मुलांनी गाड्या फोडण्याचा उच्छाद मांडला आहे. या गुन्हेगारीला रोखण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं आहे. शिवाय पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायवळ त्याचा भाऊ सचिन गायवळ याला शोधण्यात सुद्धा पोलिस अपयशी ठरतायत दुसरीकडे जिथे या कुख्यात गुंडांशी प्रकरणाच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आला आहे त्याच पोलिस ठाण्यात असं जंगी सेलिब्रेशन होत असल्यामुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरी होणं याला विरोध नसला तरी सुद्धा भान हरपून त्याचं सेलिब्रेशन होता कामा नये तसेच ज्या वास्तू मध्ये या गोष्टी होतायत त्याचं पावित्र्य जपलं गेलं हवं. पोलिस ठाण्यात नागरिक आपली व्यथा मांडण्यासाठी आणि मदतीसाठी येतात. त्या संस्थेला एक मान आणि आदर आहे. संबंधित पोलिस निरीक्षक यांनी जरी असं सेलिब्रेशन करण्यासाठी परवानगी दिली असली काय नसली काय पण इतर अधिकारी आणि संपूर्ण ठाण्यातील कर्मचारी याला जबाबदार धरले जातात, असं मत एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यानी (नाव न टाकण्याच्या अटीवर) व्यक्त केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.