Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांनी लिंगपिसाट अशोक खरातला आणलं वठणीवर

पोलिसांनी लिंगपिसाट अशोक खरातला आणलं वठणीवर


नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. राज्य सरकारने अशोक खरातच्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीकडून आज चौथ्या दिवशीही तब्बल सात तास अशोक खरातची चौकशी करण्यात आली आहे.

अशोक खरात याच्यावर आज आणखी एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात आज दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. खरात याच्या एसआयटी चौकशीनंतर क्राइम ब्रांचने अशोक खरातचा ताबा घेतला. अशोक खरातला आज क्राइम ब्रांच युनिट एकमध्ये आणण्यात आले. या दरम्यान अशोक खरातचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अशोक खरात हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं बोलताना दिसत आहे.

अशोक खरात याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे. या दरम्यान त्याला आता पोलिसी खाक्या मिळताना दिसत आहे. त्याचाच परिणाम संबंधित व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत तो पोलिसांसोबत लंगडत चालत आहे. यावेळी तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अशी घोषणा करतो. तसेच ताकद नाही राहिली, असंही तो बोलताना दिसतोय.
दरम्यान, अशोक खरातच्या चौकशी दरम्यान कमालीची गुप्तता देखील पाळली जात असल्याचं दिसत आहे. अशोक खरात याची SIT मार्फत गेल्या 4 दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. खरात याच्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ, त्याची करोडोची मालमत्ता, त्याच्या कार्यालयातील कॉम्प्युटर्स, त्याचे अध्यक्ष असलेल्या खाजगी संस्थान या संपूर्ण प्रकाराची SIT च्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून आणि अन्य अधिकारी यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. गेल्या ३ दिवसांपासून खरात याची नाशिकच्या पोलीस हेडक्वार्टर येथील हिमांशू पोलीस क्लब येथे तासंतास चौकशी केली गेली आहे. यातच रविवारी देखील खरात याची SIT कडून चौकशी करण्यात आली. मात्र आज SIT कडून खरात याची आज कमालीची गुप्तता बाळगत शहरातील एका अज्ञातस्थळी त्याची कसून चौकशी करण्यात आली.
एकूणच भोंदू बाबा अशोक खरात याच्या तपासप्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थानच्या संदर्भातील SIT चौकशी ही केली जात असून, आता या प्रकरणात काय महत्त्वाचे धागे-दोरे पोलिसांच्या हाती लागतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.