Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गॅस सिलिंडरच्या बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल, दुसरं सिलिंडर बुक करण्यापूर्वी पाहा नवे नियम

गॅस सिलिंडरच्या बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल, दुसरं सिलिंडर बुक करण्यापूर्वी पाहा नवे नियम

जागतिक परिस्थिती पाहता घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगशी संबंधित नियमात बदल करण्यात आले आहेत. आता बुकिंगची वेळ १५ दिवसांनी वाढवून २१ दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच आता एक सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरं सिलिंडर डिलिव्हरीदरम्यान २१ दिवसांचं अंतर असेल. एजन्सीचे सॉफ्टवेअर तातडीने अपडेट करण्यात आलं आहे. बुकिंगची पद्धत आधीप्रमाणेच असेल. ग्राहक सिलिंडर मिळताच पुढील बुकिंग करू शकतात.

वर्षाला १५ सिलिंडर खरेदी करण्याची परवानगी...

तेल कंपन्यांची घरगुती गॅस सिलिंडरसाठी आधीच काही नियम तयार केले आहेत. ज्यानुसार, प्रत्येक ग्राहकाला वर्षाला १२ सबसिडीचे सिलिंडर मिळू शकतात. याशिवाय ३ सिलिंडर सबसिडीशिवाय घेता येऊ शकतं. याप्रकारे १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान एक गॅस कनेक्शनवर एकूण १५ सिलिंडर खरेदी केलं जाऊ शकतं.


२४ तासात सिलिंडर डिलिव्हरीचे नियम

तेल कंपन्यांनी बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत सिलिंडर पोहोचवणे बंधनकारक केलं आहे. यामुळे ग्राहकांना मोठी सोय होते.

आता दुसरं सिलिंडर २१ दिवसांनंतर मिळेल...

आता नवा नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार, दुसरं सिलिंडर पहिलं सिलिंडर मिळाल्याच्या २१ दिवसांनंतर मिळू शकेल. यासाठी एजन्सीच्या सॉफ्टवेअरमध्ये लॉक देण्यात आला आहे. आता तरी सिलिंडरची कमतरता नाही. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्यात कारण नाही. सर्वांना पुरेसे सिलिंडर मिळतील. या आठवड्याच बॉटलिंग प्लांट रविवारीही काम करतील, जेणे करुन सप्लायमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही.

दिल्ली आणि मुंबईत सिलिंडरच्या नव्या किमती...

दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ७ मार्चपासून ११५ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. आता दिल्लीत हा सिलिंडर १८८३ रुपयांना मिळेल. ही वाढ एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या वाढीनंतर करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबईत १९ किलोचं व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १८३५ रुपयांना मिळेल. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.