आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार किती वाढणार? याकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा नजरा खिळल्या आहेत. त्याबाबत आता सरकारकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. ससंदेत सरकारकडून आठवा वेतन आयोग कधी लागू शकतो, याबाबतची माहिती दिली आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आठवा वेतन आयोगाची माहिती दिली आहे.
केंद्र सरकारकडून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची औपचारिकपणे स्थापना केल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत सांगितले. ते म्हणाले की, 'केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांसंबंधी शिफारशींसह पूर्ण अहवाल सादर करण्यासाठी या आयोगाला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा अहवाल सादर होऊन तो स्वीकारल्यानंतरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी करायची हे ठरवलं जाईल. आयोग सध्या आपला अहवाल तयार करत आहे.'
आयोग आठवा वेतन आयोगाबाबत एकाच दृष्टिकोनाने काम केले जात नाही. त्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींकडून सक्रियपणे सूचना मागवल्या जात आहे. MyGov या पोर्टलवर अठरा वेगवेगळे प्रश्न अपलोड करण्यात आले आहेत. मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि अगदी व्यक्तींकडूनही यावर मते मागवलेली आहेत. त्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. हा अभिप्राय फक्त ऑनलाइनच स्वीकारला जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ कधी होणार?
आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला, तरीही १ जानेवारी २०२६ पासून पगारवाढ लागू मानली जाईल. पण त्याचे फायदे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायला अधिक वेळ लागू शकतो, असे GenZCFO चे संस्थापक सीए मनीष मिश्रा यांनी आजतकला सांगितले.कागदोपत्री आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. पण प्ररत्यक्षात वाढीव पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २०२६ च्या शेवटी अथवा २०२६-२७ या आर्थिक वर्षातच जमा होण्याची शक्यता मिश्रा यांनी व्यक्त केला. अगदी मागील वेतन आयोगांनंतर झालेल्या विलंबाप्रमाणेच आठवा वेतन आयोगही विलंब झाल्याचेही ते म्हणाले.
आठव्या वेतन आयोगानंतर पगार किती वाढणार ?
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार वाढणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगासारखीच सर्व प्रकारची वाढ पगारात होईल. प्रतीक वैद्य म्हणाले की, मागील आयोगाचे कार्य आणि सध्याची अर्थव्यवस्था यावर पगारवाढ होतो. सहाव्या वेतन आयोगाच्या काळात पगारात अंदाजे ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर सातव्या वेतन आयोगाच्या काळात ही वाढ २३ ते २५ टक्क्यांपर्यंत होती. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेले पगारदेखील याच घटकावर अवलंबून आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.