Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खरात- रुपाली चाकणकरांची समोरासमोर बसून चौकशी करणार? फोन कॉल रेकॉर्ड, आर्थिक संबंध अन् नार्को टेस्ट

खरात- रुपाली चाकणकरांची समोरासमोर बसून चौकशी करणार? फोन कॉल रेकॉर्ड, आर्थिक संबंध अन् नार्को टेस्ट



नाशिकमधील भोंदू भविष्यकार अशोक खरात प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकरांचे खरातसोबत कौटुंबिक संबंध होते आणि त्या सुद्धा तंत्रमंत्र करायच्या आरोप अंधारेंनी केला आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणामधील सत्य समोर येण्यासाठी चाकणकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चाकणकरांनी त्यांची अनामिक तंत्रमंत्र विद्येसंदर्भातच कापली होती असा दावा करतानाच या प्रकरणामध्ये चाकणकरांनाही अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्या पत्रकाराला नोटीस कोणी पाठवली?
"या कॅप्टन फाईल्समध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात तातडीने कारवाई केल्याबद्दल गृहमंत्र्यांचे अभिनंदन," असं म्हणत अंधारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. "या केसमध्ये रुपाली चाकणकर यांचे नाव सातत्याने पुढे येते आहे. तरीही त्या दावा करताहेत की, माझा काहीही संबंध नाही. मग त्या पत्रकाराला आयोगाच्या लेटरहेडवरून कोणी नोटीस पाठवली आहे?" असा सवाल अंधारेंनी विचारला आहे.
चाकणकरांनी अनामिका का कापून घेतली?

"चाकणकर आणि खरात यांचे फक्त कौटुंबिक नाहीतर आर्थिक संबंध देखील आहेत. चाकणकर या देखील स्वतः तंत्रमंत्र करत होत्या असं आम्हाला एका पीडितेनं सांगितले आहे. या फोटोंवरूनही तसंच वाटतं," असं म्हणत अंधारेंनी चाकणकरांच्या बोटाला जखम झाल्याचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. तंत्रमंत्र विद्या आत्मसात करण्यासाठीच चाकणकर यांनी अनामिका कापून घेतली का? हा बघा त्यावेळीचा फोटो. 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या होती. त्या दिवशी चाकणकर यांनी अनामिका कापून घेतल्याचं एका पीडितेनं आम्हाला सांगितले," असं अंधारेंनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता अंधारे यांनी, "अशा प्रकारची जखम आणखी एका व्यक्तीच्या अनामिकेला होती पण त्याचे फोटो अजून समोर आलेले नाहीत," असंही म्हटलं.

पीडितांवर चाकणकर आणत होत्या दबाव
"चाकणकर यांचा एवढा सहभाग समोर येत असेल तर आमची पहिली मागणी अशी आहे की, आधी त्यांना अटक करा. लगेच त्यांची नार्को टेस्ट करा," अशी मागणी अंधारेंनी केली आहे. एवढ्यावरच न थांबता अंधारेंनी चाकणकर आणि खरात यांचे फोन रेकॉर्डस तपासण्याची आणि समोरासमोर बसवून दोघांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. "चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर तपासले जावेत," असं अंधारे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. "चाकणकर आमच्यावर दबाव आणत होत्या असंही काही पीडित म्हणतात. ईडीने खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीचे स्रोत तपासावेत. कारण खरात याची मालमत्ता ही फक्त पाथर्डी अहिल्यानगरमध्येच नाहीतर परदेशात सुद्धा असण्याची शक्यता आहे.
धमकीचे सात फोन

"चाकणकर फरार झाल्यात का हेही पोलिसांनी तपासून पाहावे. मी आज प्रेसला येत असताना मला धमक्यांचे 7 फोन आलेत. याबाबत मी पोलीसात तक्रार करणार आहे," असंही अंधारेंनी सांगितलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.