Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र चेंबरवरील निवडीबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठातर्फे स्वदेशी विला येथे सत्कार

महाराष्ट्र चेंबरवरील निवडीबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठातर्फे स्वदेशी विला येथे सत्कार


Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture (MACCIA) च्या 'क्लस्टर डेव्हलपमेंट कमिटी' सदस्यपदी श्री. बाहुबलीकुमार देसाई तसेच 'गव्हर्निंग कौन्सिल' मध्ये निमंत्रित सदस्य (Special Invitee) म्हणून श्री. अमित जयपाल चिंचवाडे यांची निवड झाल्याबद्दल दोघांचा सत्कार भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठातर्फे स्वदेशी विला येथे उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी श्री. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. रावसाहेब पाटील यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रात या दोन्ही निवडी अत्यंत प्रभावी ठरतील. अनुभवी व कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. रावसाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री रवींद्र मानगावे यांनी या निवडी केल्या यावेळी श्री. बाहुबलीकुमार देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून उद्योग, व्यापार आणि कृषी बरोबरच सांगलीमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट साठी विशेष प्रयत्न करीन. 

तसेच श्री. अमित जयपाल चिंचवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "गव्हर्निंग कौन्सिलमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील उद्योग व व्यापार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक व समन्वयात्मक भूमिका पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन."
कार्यक्रमास जैन प्रकोष्ठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास सत्कारमूर्ती श्री. बाहुबलीकुमार देसाई यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र भाजपा जैन प्रकोष्ठाचे विभागीय अध्यक्ष श्री. प्रशांत गोंडाजे, जिल्हाध्यक्ष श्री. महावीर सुरगोंडा पाटील, तसेच श्री. आश्विन पाटील, श्री. संजय पाटील, श्री. सौरभ पाटील, श्री. अक्षय पाटील, श्री. संकेत पाटील आणि श्री. आदित्य पाटील उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.