Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलावडे

सांगली बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलावडे


सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव नलावडे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. समितीत सत्ता आल्यानंतर सभापतिपदी पहिल्यांदा काँग्रेस, त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीला संधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार नवीन निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभा झाली. मिरजेचे सहकार उपनिबंधक बिपीन मोहिते निवडणूक निर्णय अधिकारी होते. यावेळी मावळते सभापती सुजय शिंदे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.


जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यासाठी नलावडे यांनी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) येथे दुसऱ्या क्रमांकावर असल्याने सभापती पदावर या पक्षाने दावा केला. राष्ट्रवादीकडून नलावडे व महेश पवार यांचे प्रयत्न सुरू होते. नलावडे यांनी अपवाद वगळता बहुतेक संचालकांना एकत्रित करून मोट बांधली होती. सभापती पदासाठी अकरा वाजता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. नलावडे यांचा एकमेव अर्ज होता. सुजय शिंदे सूचक होते, तर रामचंद्र पाटील यांनी अनुमोदन दिले.

निवडीनंतर मावळते सभापती सुजय शिंदे यांच्यासह संचालकांनी नूतन सभापती नलावडे यांचा सत्कार केला. निवडीनंतर नलावडे म्हणाले, आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, देवराज पाटील, माजी आमदार विक्रम सावंत यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या विश्वासास पात्र राहून काम करु. बाजार समितीचे विभाजन होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. जत, कवठेमहांकळ हे तालुके उत्पन्नाच्या दृष्टीने कमी आहेत. या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या उपबाजार समित्या सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.