बँकिंग क्षेत्रात विशेष तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) श्रेणीतील 116 रिक्त पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे.
विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. SBI कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या विविध पदांसाठी एकूण 116 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये AVP सिस्टम ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर (IS Audit) आणि डेप्युटी मॅनेजर (CA) यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
ही संधी आयटी, कॉम्प्युटर सायन्स, माहिती प्रणाली ऑडिट तसेच चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रातील पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी आहे. AVP सिस्टम ऑफिसर पदासाठी बी.ई./बी.टेक किंवा MCA पदवी आवश्यक आहे. डेप्युटी मॅनेजर (IS Audit) पदासाठी संबंधित पदवीसह माहिती प्रणाली ऑडिट क्षेत्रातील अनुभव किंवा CISA प्रमाणपत्र आवश्यक आहे. डेप्युटी मॅनेजर (CA) पदासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवी अनिवार्य आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 116 पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख शॉर्टलिस्टिंगनंतर जाहीर केली जाईल. ही भरती देशभरातील पात्र उमेदवारांसाठी खुली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अधिकृत SBI संकेतस्थळावरून पार पाडली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बँकेच्या विविध शाखांमध्ये किंवा विभागांमध्ये केली जाऊ शकते.या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. प्रथम अर्जांची छाननी करून शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना 100 गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. जर दोन उमेदवारांना समान गुण मिळाले, तर ज्याचे वय अधिक आहे त्याला प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, किमान वय 23 ते 25 वर्षे (पदांनुसार) आणि कमाल वयोमर्यादा 35 ते 42 वर्षे (पदांनुसार) निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. एकूणच, बँकिंग आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी SBI ची ही भरती प्रक्रिया मोठी संधी मानली जात आहे. लेखी परीक्षेविना थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असल्याने इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज शुल्क (Application Fee)
सामान्य (General), EWS आणि ओबीसी (OBC): 750 रुपये
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWD): शुल्क नाही
अर्ज कसा करावा?
SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा: sbi.co.in/careersहोमपेजवरील संबंधित जाहिरातीवर क्लिक करून 'Apply Online' निवडा.नवीन नोंदणी (Registration) करा आणि आवश्यक माहिती भरा.फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.या उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.हा अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.