राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (6 मार्च) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसंच आता या अर्थसंकल्पानंतर नेमकं काय स्वस्त आणि काय महाग होणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय स्वस्त
मोटर वाहन करात 30 टक्के सूट
पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांची मदत
अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
- राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग नोंदवावा यासाठी 8 हाय परफॉरमेंस केंद्र सुरू असून चार प्रशिक्षण केंद्र सुरू केली जाणार आहेत.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदान अकादमी स्थापन करणार आहे. राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारस्याचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे.
- नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सातारा येथे शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे जतन करण्यात येईल
- नागपुरात महाराष्ट्र आरोग्यसंस्था उभारणार
- राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यात आणखी 75,000 हजार पदांची पदभरती
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार असून राज्यातील आणखी 25 लाख महिलांना लखपती दिदी करणार
- राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पिक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर - पुणे ते शिरुर उन्नत मार्गाला मंजुरी
- लातूर, बारामती इथं रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा कार्यरत केली जाईल
- मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार
- 1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या 7 कोटीपर्यंत वाढेल
- 2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे
- 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च
- यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे
- दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत
- 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल
- राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल
- राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील
- नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडोर विकसित केले जाईल.
- मुंबई ते नवी मुंबई विमानतळादरम्यान 22865 कोटींचा नवा मेट्रो मार्ग हाती घेणार - सातपाटीत आधुनिक मत्स्यबंदर उभारणार
- अटल सेतू महामार्गाजवळ तिसरी मुंबई विकसित केली जाईल तर, वाढवणजवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजन
- निवडक 50 पर्यटन स्थळी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल
- वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे
- राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथे होईल
- चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य करणार
- 5 ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहे, त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल
- शाश्वत विकासासाठी सक्षम प्राधिकरण स्थापन करणार
- वाहतूक केंद्रीच विकास व 100 टक्के डिजिटायझेशन करणार
- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम 2027 पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल
- तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
- चौथी मुंबई वाढवण येथे होईल; एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार
- नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
- यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या पायाभूत सुविधांवर भर
- पुण्यात नवीन 11 किलोमीटरच्या मेट्रोमार्गाला मंजूरी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
