Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुपाली चाकणकरांचा SIT चौकशीला हजर राहण्यास नकार हास्यास्पद कारण सांगितलं

रुपाली चाकणकरांचा SIT चौकशीला हजर राहण्यास नकार हास्यास्पद कारण सांगितलं


अशोक खरात प्रकरणात कनेक्शन समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून रुपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीसाठी नाशिकला येण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाशिक पोलीस अकॅडमी येथे सुरू असलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (एस आय टी) चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याचे हास्यास्पद कारण देत रुपाली चाकणकर यांनी नाशिकला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. याऊलट त्यांनी ही चौकशी पुणे किंवा मुंबईमध्ये व्हावी, अशी मागणी केल्याचेही सांगण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर या त्यांच्या पुण्यामधील निवासस्थानीही वास्तव्यास नसल्याचे समोर आले आहे. त्या नाशिकला पोहोचल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. एकूणच रुपाली चाकणकरांच्या या भूमिकेमुळे त्यांचे खरात प्रकरणात नेमकं कनेक्शन काय? याचे गुढ आता वाढत चालले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.