Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! शिक्षण क्षेत्र हादरले! ५२ हजारांची लाच घेताना नाशिकचा गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

Big Breaking! शिक्षण क्षेत्र हादरले! ५२ हजारांची लाच घेताना नाशिकचा गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात!


नाशिक : - शिक्षक दाम्पत्याच्या एकस्तर वेतनश्रेणी फरकाच्या थकबाकीचे देयक संबंधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे आणि तसेच ते मंजूर करण्यासाठी ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षक आणि नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. 

​दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (वय ४८), नीलेश निंबा भारती (वय ५०, प्राथमिक शिक्षक, निगडोल, दिंडोरी) आणि जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील (५०) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार व त्यांची पत्नी दोघे शिक्षक असून ते 'पेसा' या विशेष कार्यक्षेत्रातील नियुक्तीस आहेत. २००२ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंतच्या पेसा विशेष कार्यक्षेत्रातील एकस्तर वेतनश्रेणीच्या थकीत फरकाचे देयक त्यांनी दिंडोरी पंचायत समितीला सादर केले गेले होते.
या देयकाची तक्रारदाराची रक्कम ६ लाख ५७ हजार ८०८ आणि त्यांच्या पत्नीची ६ लाख ५५ हजार ६०० रुपये मंजूर करून हा प्रस्ताव जिल्हा परिषदेतील वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराने पाठपुरावा केला होता. तेव्हा गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण आणि शिक्षक नीलेश भारती यांनी थकीत रकमेचे देयक काढण्यासाठी पडताळणी कारवाई व सापळा कारवाईदरम्यान, गटशिक्षणाधिकारी चव्हाण याने देयक सादर केल्याच्या मोबदल्यात एक टक्का रक्कम स्वीकारली होती.

​तर शिक्षक नीलेश भारती याने हे देयक जिल्हा परिषदेत सादर करून त्याची प्रत तयार करण्यासाठी सुरुवातीला पाच टक्के रक्कम आणि नंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तीन टक्के केलेली लाचेची रक्कम स्वतःसाठी आणि जिल्हा परिषदेतील उपलेखाधिकारी देविप्रसाद पाटील यांना कळविले गेले होते. त्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन होते.
​या घटनाक्रमात संशयितांनी ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी चव्हाण, शिक्षक भारती व कनिष्ठ लेखा अधिकारी पाटील यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनीलदोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी काम पाहिले आणि तर पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांचा समावेश होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.