Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! सांगली रक्ताळली! २४ तासात दोन थरारक खून; किरकोळ वादातून मित्रानेच काढला मित्राचा काटा.

Big Breaking ! सांगली रक्ताळली! २४ तासात दोन थरारक खून; किरकोळ वादातून मित्रानेच काढला मित्राचा काटा.


नांदेडनंतर सांगलीमध्ये हत्येची मालिका घडत आहे. गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यातील दोन हत्येच्या घटना घडली आहेत. सांगलीमधील कवलापूर येथे एका मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे. यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या विश्वास कलाप्पा सुतार या 32 वर्षे तरुणाच्या डोक्यात त्याच्याच मित्राने दगड घालून त्याचा खून केला. याप्रकरणी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

दारूच्या नशेत यात्रेमध्ये फिरताना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ केली, त्यानंतर सुतारच्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घातला. तर कुपवाड मध्ये दगडू सुखदेव केंगार या 55 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह मिळून आला आहे. दगडू केंगार हा इचलकरंजी येथे बांधकाम कामगार म्हणून काम करत होता.
दगडू केंगार याच्या अंगावर मारहाणीचे वळ उमटले आहेत. दगडू केंगार याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत. दरम्यान त्याचा कुटुंबातीलच नातेवाईकांनी खून केल्याचा संशय असल्याने दगडू केंगार याच्या नातेवाईकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे मात्र खळबळ उडाली आहे. नांदेडनंतर सांगलीमध्ये हत्यांची मालिका सुरू आगहे. नांदेडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये ५ जणांची हत्या झाली आहे. या वाढलेल्या गुन्हेगारीमुळे राज्यातील सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. पाच दिवसापूर्वीसुद्धा सांगलीमधील जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ हत्येची घटना घडली होती. 
सौरभ महादेव पवार (वय 22, रा. राजीवनगर, कुपवाड रस्ता, सांगली) या तरुणाचा दोघांनी पाठलाग करून निर्घृण खून केला होता. दरम्यान संशयित शाहीद समीर मुल्ला व आयान समीर भिस्ती (दोघे रा. राजीवनगर) या दोघांनी हा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहीद मुल्ला याला पोलिसांनी पकडलं तर आयान पसार झाला होता. मृत सौरभ हा घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.