सांगली: समृद्ध लोकशाहीचा पाया पंचायत राज संस्था - प्रा. डॉ. सिकंदर जमादार
सांगली: "समृद्ध लोकशाहीचा पाया हा पंचायत राज संस्था आहेत. तळागाळातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण समुदायाला सक्षम करण्यासाठी ७३ व्या घटनादुरुस्तीने या व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला," असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. डॉ. सिकंदर जमादार यांनी केले.
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे २४ एप्रिल रोजी 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. जमादार पुढे म्हणाले की, "डॉ. मनमोहन सिंग यांनी या दिनाचे महत्त्व ओळखून तो राष्ट्रीय स्तरावर घोषित केला. जर पंचायत राज संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि महिलांचा सहभाग वाढला, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होईल."
नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार:
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सांगली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य सागर बिरनाळे व अमित शहा, तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सुरज मगदूम व ॲड. अरविंद सकपाळ यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवर:
राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मा.नगरसेवक हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुचेता कांबळे, प्रा. अरविंद जैनापुरे, प्रकाश जगताप, मुनीर शिकलगार, संदीप आडमुठे, विश्वास यादव, नामदेव पठाडे, श्रमण मगदूम, योगेश पाटील, शैलेंद्र पिराळे आणि विठ्ठलराव काळे, मौला वन्टमुरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.