Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'धुरंधर २' मध्ये फक्त ५ सेकंदांची झलक; पण मानधन ऐकून डोळे पांढरे होतील! वर्षाचा पगारही फिका पडेल.

'धुरंधर २' मध्ये फक्त ५ सेकंदांची झलक; पण मानधन ऐकून डोळे पांढरे होतील! वर्षाचा पगारही फिका पडेल.


एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की त्या चित्रपटातल्या कलाकारांचीही चांदी होते. 'धुरंधर' आणि धुरंदर २' ने प्रेक्षकांना भुरळ पाडलीये. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालल्याने त्यातील कलाकारही प्रेक्षकांमध्ये चर्चेत आले.

रहमान डकैतची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना असो किंवा जमील जमालीची भूमिका साकारणारे राकेश बेदी असोत. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगलीय. एका सपोर्टींग अभिनेत्रीचा अवघ्या ५ सेकंदाचा रोल सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. सोबतच त्या अभिनेत्रीने घेतलेलं मानधन ऐकून चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात.

'धुरंधर २' मध्ये क्लायमॅक्सच्या वेळेला रणवीर सिंह म्हणजे हमजा खूप जखमी होतो. त्याला भारतात पाठवण्याची तयारी केली जाते. यावेळी राकेश बेदी म्हणजे जलील त्याला चार्टर्ड प्लेनपर्यंत सोडतात. तेव्हा हमजा ज्या विमानात जातो तिथे एक एअर होस्टेस असते. जी त्याच्यासाठी दरवाजा देखील उघडते. हा क्षण अगदी काही सेकंदाचा असतो. या सीनमध्ये जी अभिनेत्री दिसते तिला तुम्ही नीट पाहिलंही नसेल. मात्र हीच अभिनेत्री आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही अभिनेत्री आहे नियती पारीख. नियतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यानंतर या सगळ्याची चर्चा होऊ लागली. या व्हिडीओसोबत तिने एक कॅप्शन देखील लिहिलं आहे जे अतिशय इंटरेस्टिंग आहे. 'धुरंधर 2' मध्ये मला कुणी कुणी पाहिलं?

किती मिळाले पैसे?
नियतीने हि भूमिका केल्याचं समजल्यावरकही लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या भूमिकेसाठी तुला १००- ५०० रुपये नक्कीच मिळाले असतील असं त्यांनी लिहिलं. यावर नियतीने तिला या भूमिकेसाठी तब्बल २२ लाख रुपये मिळाल्याचं सांगितलंय. इंस्टाग्रामवर तिचे फक्त 2500 फॉलोअर्स आहेत. यामध्ये अभिनेत्रीने धुरंधरच्या अनेक कलाकारांसोबत आपला फोटोज देखील शेअर केले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.