Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू, कोंबडी आणि बकऱ्याचा कलेजा... मालाडच्या 'माँटी बाबा'चा असा व्हायचा दरबार; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

दारू, कोंबडी आणि बकऱ्याचा कलेजा... मालाडच्या 'माँटी बाबा'चा असा व्हायचा दरबार; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!


मुंबई: नाशिक मधल्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचं समोर आल आहे. सध्या अशोक खरात हा पोलिस कोठडीत आहे. राज्यात अनेक भोंदू बाबा आहेत की जे देव धर्माच्या नावावर लुटण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता नाशिक नंतर मालाड चा बाबा चर्चेत आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो अंगातील भूत काढून देतो. म्हणून बकरी, कोंबडी, काळीज आणि दारू मागायचा मात्र या भोंदू बाबा कांड उघड पडल आणि त्याला सध्या अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी आणि शनिवारी देवी अंगात यायची
रिधम पांचाल उर्फ माँटी बाबा याला अटक करण्यात आली आहे. ज्या महिलांना मुल होत नाही त्यांना पण मुल होण्याचा तो दावा करत होत. आता पर्यंत त्याच्या कडे ६० महिला गेल्या होत्या. पण त्याचा वीडियो एक व्हायरल झाला आणि त्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा बाबा दारू, सिगारेट आणि कोंबडी आणि बकरीच काळीज मागत होता. त्याला अखेर अटक करण्यात आली आहे.
बाबा भरवायचा दरबार

रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत तो आपला आपला दरबार भरवत असे. त्याच्याकडे अनेक ठिकाणावरून पुरुष, स्त्रिया आणि मुली मोठ्या संख्येने येत होत्या. तो लोकांचे आजार पण बर करतो असा तो दावा करत असायचा. फक्त आजारच नाही तर तो स्त्रियांना मूल होत नाही त्यांना मूल होण्यासाठी मदत करायचा असा दावाही तो करायचा. त्याचा वीडियो व्हायरल झाल्यावर त्याला सध्या अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात दाखल केल्यावर पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस पुढचा तपास करत आहेत. या तपासामधून आणखी काही धक्कादायक खुलासे बाहेर येवू शकतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.