"गेट आऊट ऑफ हिअर!" संतापलेल्या महिलेने मंत्री गिरीश महाजनांना झापले; मुंबईत भाजपच्या मोर्चामुळे वाहतुकीचा खोळंबा.
महिला आरक्षणाआडून सोयीची मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव उधळला गेल्यानंतर भाजपने आता मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. वाहतूककोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने गेट आऊट ऑफ हिअर… असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावत आक्रोश व्यक्त केला. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने मंगळवारी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला. वरळी जांबोरी मैदान ते वरळी डोमदरम्यान या मोर्चामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. लोकांना मनःस्ताप सहन करावा लागला.
देशातील महिला अशाच भाजपला सत्तेतून हाकलतील – सपकाळ
आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. 'भाजप भगाओ, देश बचाओ!' असे ट्विट काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे, असे सपकाळ म्हणाले. आणि संतप्त झालेल्या या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. तुम्हाला काय करायचं ते मैदानामध्ये जाऊन करा, मी एका तासापासून इथे उभी आहे. ट्राफिक कशाला रोखता? रस्ता मोकळा करा, गेट आऊट ऑफ हिअर… असे ती म्हणाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.