Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चाकणकरांना समन्स कधी? तेजस्वी सातपुतेंनी सांगितलं एसआयटीच्या चौकशीचं 'नवे गणित'

चाकणकरांना समन्स कधी? तेजस्वी सातपुतेंनी सांगितलं एसआयटीच्या चौकशीचं 'नवे गणित'


मुंबई : भविष्य सांगण्याचा दावा करणारा भोंदू अशोत खरातवर महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. खरातच्या दरबारात हजेरी लावणे, त्याच्यावर छत्र धरणे, त्याचे पाद्यपूजन करणे, अशी कामे करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले. 
मात्र एवढं झाल्यानंतरही रुपाली चाकणकरांची अद्याप चौकशी का झाली नाही? असा सवाल वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला जातो. अखेर आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चाकणकरांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. अशोक खरातबरोबरची जवळीक दोन महत्वाची पदे गेली आहेत. खरात प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास केला जात आहे. खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानशी संबंधित सर्व आजी-माजी सदस्यांची आता चौकशी होणार असल्याचे पुढे येत आहे. रुपाली चाकणकर या श्री शिवनिका संस्थानच्या कार्यकारिणीत सदस्या होत्या. त्यामुळे आपसूकच इतर सदस्यांप्रमाणे त्यांचीही विशेष तपास पथकाकडून कडून चौकशी होऊ शकते. मात्र ही चौकशी कधी होणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता. अखेर आजच्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाता कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

चौकशी कधी केली जाणार?

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, एसआयटीने काहींना तपासासाठी का बोलावले नाही असा सवाल वारंवार विचारल जात आहे. मात्र आपल्याकडे तपासादरम्यान पुरावे जे समोर येतात त्यानुसार संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाते. आपल्याकडे फिर्याद आणि साक्षीदार यांच्या माहितीनुसार कारवाई होते मुख्य आरोपी सोडून कोणी मदत केली आहे का? त्याचा तपास करत आहोत . याबाबात पुरावे समोर आले तर चौकशी केली जाणारच आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

सीडीआर लीक कुणी केले?
अलीकडेच अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील 177 फोन कॉल्सची माहिती उघड केली होती. सीडीआर लीक प्रकरणावर तेजस्वी सातपुते म्हणाल्या , शासन स्तरवार चौकशी होत आहे. चौकशीत जे समोर येईल ते आपल्यासमोर येईल.
मालमत्तेसंदर्भात काय म्हणाल्या तेजस्वी सातपुते?

गेली 17 दिवस SIT तपासात करत आहे. चार्जशीट दाखल होईल पर्यंत गोपनीयता बाळगावी . काही कारणाने आपण त्या आरोपीला vc द्वारे हजर करत आहोत. त्याच्या मालमत्तेबाबत अनेक प्रश्न आहे. ED ला आम्ही सगळी माहिती दिली आहे, त्यांना अजून काही माहिती हवी असेल तर ती देखील देऊ, असेही तेजस्वी सातपुते म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.