Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण विशेष! ​'प्रवीण'आण्णाचा समांतर कारभार: शासनाचा कोट्यवधींचा 'व्हॅट' आणि 'टॅक्स' डब्यात!

सांगली दर्पण विशेष!   ​'प्रवीण'आण्णाचा समांतर कारभार: शासनाचा कोट्यवधींचा 'व्हॅट' आणि 'टॅक्स' डब्यात!


सांगली :- ​सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सध्या एका 'प्रवीण' नावाच्या व्यक्तीच्या कारनाम्याने महसूल विभागाचे कंबरडे मोडले आहे. सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून, या प्रवीण आण्णाने तब्बल १०० ते १५० बारमध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. या साखळीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा टॅक्स आणि व्हॅट  बुडत असून, अधिकारी मात्र 'अर्थपूर्ण' शांतता बाळगून आहेत.

​काय आहे नेमका 'कारनामा'?

​नियमानुसार, प्रत्येक परमिट रूम/बारमध्ये चढ्या दराने विकला जाणारा 'ट्रेड'चा माल असणे बंधनकारक असते. मात्र, या प्रवीण आण्णाने आपल्या दहशतीचा वापर करून बार मालकांना 'सागर किनारे' येथूनच माल घेण्याची सक्ती केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बारमध्ये मिळणारा ९० टक्के माल हा प्रत्यक्षात वाईन शॉपचा असतो.

​असा चुकवला जातो 'टॅक्स' आणि 'व्हॅट'
​वाईन शॉपमधून मिळणारा माल हा बारच्या तुलनेत स्वस्त असतो. हा माल बेकायदेशीरपणे बारमध्ये खपवून शासनाचा 'व्हॅट'  आणि उत्पादन शुल्क टॅक्स मोठ्या प्रमाणावर चुकवला जात आहे. यात परमिट रूम मालकांचा मोठा आर्थिक फायदा होत असल्याने तेही या अनैतिक साखळीत सामील झाले आहेत. शासनाचा महसूल बुडवून यातून प्रवीणआण्णा नावाच्या या इसमाने कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.
​अधीक्षकांचे अभय कोणाला?

​या सर्व बेकायदेशीर व्यवहारांची आणि करचोरीची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असूनही, ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. "अधीक्षक माझ्या शब्दाबाहेर नाहीत", असे प्रवीण उघडपणे सांगत फिरत असल्याने विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. या मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीत नेमके कोणाचे खिसे भरले जात आहेत? आणि या प्रवीणचा 'गॉडफादर' कोण? अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कारवाई होणार की 'अर्थपूर्ण' शांतता?
​एकीकडे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व्यावसायिकांवर नियमांचा बडगा उगारला जात असताना, दुसरीकडे शासनाचा टॅक्स चोरणाऱ्या या प्रवीण आण्णाला मोकळे रान का दिले जात आहे? सांगलीच्या उत्पादन शुल्क अधीक्षकांनी या 'टॅक्स चोरी' प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून, या अवैध साखळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता अधीक्षक खरोखर धडक कारवाई करणार की या 'अर्थपूर्ण' शांततेतच धन्यता मानणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रर्मश.....



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.