Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! व्हिडिओच्या जोरावर विवाहितेचे दोन वर्ष शोषण; पंढरपुरात ग्रामपंचायत शिपायाचा काळा प्रताप उघड

धक्कादायक! व्हिडिओच्या जोरावर विवाहितेचे दोन वर्ष शोषण; पंढरपुरात ग्रामपंचायत शिपायाचा काळा प्रताप उघड


पंढरपूर: माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून, तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकलूज पोलिसांनी गिरझणी ग्रामपंचायतीचा शिपाई उमेश जगन्नाथ साठे याला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश साठे याने पीडित महिला अंघोळ करत असताना आपल्या मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ चोरून चित्रित केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. याच भीतीपोटी पीडितेने गप्प राहण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या काळातही त्याने पीडितेचे आणखी अश्लील व्हिडिओ काढून तिला सतत ब्लॅकमेल केले. 


पीडितेच्या पतीला काही दिवसांपासून संशय येत होता. त्यांनी पत्नीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने रडत सर्व आपबिती सांगितली. हा धक्कादायक प्रकार समजताच पीडितेने पतीसह अकलूज पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अकलूज पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी उमेश जगन्नाथ साठे याला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे माळशिरस तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.