१२ वर्षांत पहिल्यांदाच हार; सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता वाढली, आता थेट 'सर्जिकल स्ट्राईक'च्या तयारीत भाजप
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला. २०२९ च्या निवडणुकीसाठी मास्टरस्ट्रोक समजल्या जाणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा झटका बसला. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच असे घडले. मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच सरकार एखादे विधेयक सभागृहात मंजूर करू शकले नाही. हे मोदी सरकारच्या चांगलेच जिव्हारी लागले. यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आणि एनडीएच्या महिला खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन सुरू केले. विरोधकांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केला आहे, अशा घोषणा त्यांनी दिल्या. महत्वाचे म्हणजे विधेयक मंजूर न झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी उद्यापासन देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. एनडीएचे कार्यकर्ते उद्यापासून इंडिया आघाडीतील नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनं करणार आहेत.महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी नाराज झाले. या पराभवानंतर एनडीएच्या फ्लोअर लीडर्सची संसदेतच एक महत्वाची आणि तातडीची बैठक बोलावण्यात आली. ही बैठक सध्या सुरू आहेत. या बैठकीला एनडीएचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. जेपी नड्डा, किरण रिजिजू, श्रीकांत शिंदे, अनुप्रिया पटेल, आणि एनडीएचे इतर महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमुळे पुढील रणनीती ठरवली जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. पण आज मतदानाच्या दिवशी लोकसभेत हे विधेयक बहुमताअभावी पडले. ५२८ खासदारांनी या विधेयकासाठी मतदान केले. विधेयक मंजूर करण्यासाठी ३५२ मतांची गरज होती. पण विधेयकाच्या बाजूने फक्त २९८ मतं पडलं. तर विधेयका विरोधामध्ये २३० मतं पडली. फक्त २८ मतांनी हे विधेयक लोकसभेत पडलं. त्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.