Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"कलिंगड प्रेमींना मोठा धक्का! आता बाजारात कलिंगड दिसणार नाही? विक्रेता संघटनेचा अत्यंत कठोर निर्णय!"

​"कलिंगड प्रेमींना मोठा धक्का! आता बाजारात कलिंगड दिसणार नाही? विक्रेता संघटनेचा अत्यंत कठोर निर्णय!"


मुंबई : पायधुनी परिसरातील घाटी मोहल्ल्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कालपर्यंत हसण्या-बोलण्याने गजबजलेलं डोकाडिया कुटुंबाचं घर आज पूर्णपणे ओस पडलं आहे. घराच्या दाराशी फक्त चपलांचा खच दिसतो, तर आत गेल्यावर काल रात्रीचे अर्धवट अन्न तसेच पडलेले दिसते. अर्धवट राहिलेली बिर्याणी आणि कापलेले कलिंगड हे दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतात.

मृतदेह घरी येताच नातेवाइकांचा आक्रोश

सोमवारी चौघांचे मृतदेह घरी आणण्यात आले. त्यावेळी नातेवाइकांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि घरात पूर्ण शांतता पसरली.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने रात्री एकत्र जेवण केले होते. त्यानंतर उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर सर्वजण झोपले. पहाटेपासून त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असतानाच एकामागून एक मृत्यू झाले. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
शेजाऱ्यांकडून हळहळ व्यक्त

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब अतिशय साधं आणि आनंदी होतं. कुणाशीही वाद न करता शांतपणे राहणारे हे लोक अचानक गेल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

कलिंगडाबाबत संभ्रम

या घटनेनंतर कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते हे कलिंगड ऑनलाइन मागवण्यात आले होते, तर काही जण ते नळबाजारातून खरेदी केले असल्याचे सांगतात. तसेच ते कलिंगड काही दिवसांपूर्वीचे असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेचे वेळापत्रक
२५ एप्रिल, रात्री १०:३० - कुटुंबाने एकत्र जेवण
२६ एप्रिल, रात्री १:०० - कलिंगड खाल्ले
पहाटे ५:३० पासून - उलटी-जुलाब सुरू
सकाळी ९:३० - सर्वांची प्रकृती बिघडली
सकाळी ९:३० - लहान मुलगी जैनबचा मृत्यू
दुपारी १:३० - नसरीनचा मृत्यू
सायंकाळ/रात्री - अब्दुला आणि आयेशाचा मृत्यू
कलिंगड न विकण्याचा निर्णय

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कलिंगडामुळे मृत्यू झाल्याची चर्चा पसरल्यानंतर नळबाजार फ्रूट अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष अली अहमद कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांमधील भीती पाहता काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.