Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धाराशिव पॅटर्न! भोंगा वाजताच २ तास टीव्ही-मोबाईल बंद; विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

धाराशिव पॅटर्न! भोंगा वाजताच २ तास टीव्ही-मोबाईल बंद; विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय


धाराशिव : टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. ज्यामध्ये संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सर्वत्र दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. 
गावात भोंगा वाजून या वेळीची सूचना दिली जाईल. तसेच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेख ही ठेवली जाणार आहे. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायतीचा  यामध्ये सहभाग करून घेणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं.
शिवाय जिल्हा परिषद शाळेत पुन्हा एकदा सेमी इंग्लिश पॅटर्न राबवला जाणार आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी यासाठी वाचन मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं. याअभिनव उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा असून धाराशिवकरांकडूनहीया निर्णयाचं स्वागत केल्या जातअसल्याचं बोललं जात आहे.

अर्चना पाटील यांचे पालकांना आवाहन 
दरम्यान, याउपक्रमाद्वारे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सर्वत्र दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. त्यासाठी एका भोंग्याच्यामाध्यमातून वेळ निश्चित केला जाईल. हा भोंगा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला बसण्याची आणि पालकांसाठी टीव्ही बंद करण्याची 'अलार्म बेल' असेल. तरदुसरीकडे नुसता हा कागदावर निर्णय नघेता आणि एवढ्यावरच न थांबता, गावात शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक या दोन तासांत गावात गस्त घालेल. घरोघरी जाऊन खरोखरच टीव्ही बंद आहेत का आणि मुले अभ्यासात मग्न आहेत का, याची प्रत्यक्ष खातरजमा हे पथक करणार आहे. 

प्रशासनासोबतच पालकांनीदेखील याउपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दोन तास टीव्हीचा त्याग करावा. हे केवळ प्रशासनाचे काम नसून संपूर्ण समाजाचे योगदान आहे, असेही अर्चना पाटील म्हणाल्या. या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असले तरी, घराघरातील टीव्ही बंद करण्याच्या सक्तीवर धाराशिवकरआता काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.