Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​सीईटी केंद्रांचा गोंधळ: लांबच्या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांची फरफट, पालकांचा संताप कल्लोळ!

सीईटी केंद्रांचा गोंधळ: लांबच्या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांची फरफट, पालकांचा संताप कल्लोळ!


कोल्हापूर: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे परीक्षा केंद्रे दूरच्या ठिकाणी मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत असताना, दुसरीकडे परीक्षा प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप आणखी वाढला आहे. सीईटीसाठी शनिवारी पहिल्या सत्रातील परीक्षा पार पडली. याशिवाय दुसऱ्या सत्रातील परीक्षा शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी होणार आहे, अनेक विद्यार्थ्यांना सांगली, सातारा, पुणे तसेच इतर दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहाटे लवकर निघावे लागणे, राहण्याची व्यवस्था करावी लागणे आणि अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, काही परीक्षा केंद्रांवर गंभीर तांत्रिक अडचणींचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परीक्षेदरम्यान संगणकाच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका व्यवस्थित दिसत नव्हती. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या सत्रातील परीक्षा होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना सांगली, सातारा, पुणे तसेच इतर दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे मिळाल्याच्या तक्रारी आहेत. राहण्याची व्यवस्था करावी लागणे आणि अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. नव्हती, काही ठिकाणी पूर्ण प्रश्न स्क्रीनवर न दिसणे, तर काही ठिकाणी एकावेळी एकच प्रश्न दिसणे अशा अडचणी उ‌द्भवल्या. या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला आणि परीक्षेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता, "आम्ही केवळ परीक्षा आयोजित करण्याचे काम करतो, तांत्रिक बाबी सीईटी विभागाच्या अखत्यारीत आहेत," असे उत्तर देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

परीक्षा केंद्रांची संख्या वाढवा...
विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी, केंद्रे जवळच्या परिसरात द्यावीत, तसेच तांत्रिक सुविधा व मूलभूत सोयीसुविधा सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित यंत्रणांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकच नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याच्या तक्रारी आहेत. हजारो रुपयांची परीक्षा फी आकारली जात असताना, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही योग्य सोय नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेबाबतही अशाच तक्रारी समोर आल्या होत्या. काही भागांत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने पुरेसे संगणक उपलब्ध नव्हते, तर काही केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच पेपर सोडवावा लागल्याने मोठा अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.