Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात 'पवार' पॉवर एकत्र! शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

पुण्यात 'पवार' पॉवर एकत्र! शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत


पुणे: पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शरद पवार यांनी पुण्यातील 'मोदी बाग' या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाची एकत्रित बैठक बोलवली आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत ही कौटुंबिक बैठक पार पडत आहे. गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींनंतर संपूर्ण कुटुंब अशा प्रकारे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बैठकीला कोणाची उपस्थिती?

या बैठकीला शरद पवारांसह प्रतापराव पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, सदानंद सुळे, अभिजीत पवार असे सर्व कुटुंब या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अशाप्रकारे अचानक पवार कुटुंबाची बैठक बोलवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी आणि स्नेहभोजनासाठी बोलवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज अजित पवारांच्या निधनाला ३ महिने पूर्ण झाल्याने याच पार्श्वभूमीवर कुटुंबीयांशी चर्चा करण्यासाठी पवारांनी ही बैठक बोलवली असावी, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांच्या निधनाला तीन महिने पूर्ण होऊन सीआयडी तपासात अद्याप काहीच समोर आलं नाही. ब्लॅक बॉक्सबाबतही ठोस माहिती समोर आली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अशात पवारांनी पवार कुटुंबाची बैठक बोलावल्याने या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकं काय घडणार? यातून काही राजकीय पावलं उचलली जाणार का? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.