Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"खरा सूत्रधार फडणवीसच!" रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राऊतांचा सर्वात मोठा धमाका

"खरा सूत्रधार फडणवीसच!" रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राऊतांचा सर्वात मोठा धमाका


पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याचे ट्वीट शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असल्याचा दावा करत ही फक्त सुरुवात असल्याचे देखील रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

रोहित पवारांनी केलेल्या या दाव्यानंतर आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रोहित पवार जे म्हणतात ते खरं आहे खरातच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जात आहेत.

अशोक खरातचे पायाशी बसून फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री जे काही उपद्व्याप करत होते. त्याची माहिती समोर आली की आपोआप सर्वांचे बळी जातील, असा मोठा बॉम्ब संजय राऊतांनी टाकला आहे.

फडणवीसांवर जोरदार टीका

संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचा बळी घेणं हा छंद आहे. फडणवीसांना अशा शिकारीचा नाद आहे, असे ते म्हणाले.

गोष्टी समोर आल्यानंतर वादळ येईल: राऊत

अशोक खरात प्रकरणावर बोलताना संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. अशोक खरात फाशीवर जाईल, त्याला जन्मठेप होईल या सर्व गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी येणार आहेत, ज्या कागदावर आहेत, जे अत्यंत गोपनीय आहे, ते समोर आल्यानंतर जे वादळ येईल ते महत्त्वाचे आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक खरात प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत थेट खरातचा सीडीआर समोर आला होता. रुपाली चाकणकरांसह अनेकांची नावे घेत कोणी किती वेळा अशोक खरातसोबत फोनद्वारे बोलले याबद्दल सांगितले.

संजय राऊतांनी थेट कोणाचे नाव घेतले नाही पण कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही माहिती गोपनीय असते. पण ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने ती बाहेर आली असल्याचे म्हटले आहे.

ही माहिती कोणाच्या व्हॉटसअॅपवर सहज येत नाही. मी इतके वर्ष खासदार आहे. पण मला सीडीआर मिळणार नाही. मला कोणी देणार नाही, ज्याच्या हातात सूत्र आहेत. ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री यांच्या मदतीशिवाय तुम्हाला सीडीआर मिळू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.