बँक वसुली की गुंडगिरी? पुण्यात क्रेडिट कार्ड वसुलीसाठी नागरिकावर जीवघेणा हल्ला; संतापजनक व्हिडिओ समोर
हडपसर: क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून एजंटांकडून थेट रस्त्यावर मारण्याची धक्कादायक घटना घडली. अशी मारहाण करण्याचा अधिकार वसुली एजंटला कोणी दिला. असा सवाल आता नागरिक करीत आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर चौकात तीन वसुली एजंटांनी एका नागरिकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी ( 27) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसरपोलिस काय कारवाई करणार आहेत याकडे नागरिकांचे लक्ष आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा या घटनेबाबत त्या एजंट लोकांवर कारावियाची मागणी केली आहे.
संदीप जामदार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे हे तिघे वसुली एजंट थकबाकी वसूल करण्यासाठी जामदार यांना पंधरा नंबर चौकात अडवले. यावेळी वाद निर्माण होऊन त्या रूपांतर थेट मारहाणीत झाले.
संबंधित एजंटांनी जामदार यांना भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी त्यांच्यासोबत असलेली महिला हात जोडून मारहाण करू नका. अशी विनंती करत होती. मात्र एजंटांनी तिचीही पर्वा न करता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या कारवाईमुळे एजंटांना पोलिसांकडून एकप्रकारे मोकळीक मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेदरम्यान एजंटांकडून "चला पोलीस ठाण्यात, दाखवतो" अशा धमक्या दिल्या. याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचे हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले.
खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे - अमोल कोल्हे
या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बॅंकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बॅंकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.