कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी दावा केला आहे की, येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि भाजप आपल्या मित्रपक्षांना फोडण्यासाठी तथाकथित 'ऑपरेशन लोटस' सुरू करेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भाकीत केले आहे की, येत्या आठ दिवसांत महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय भूकंपाने हादरून जाईल. त्यांचा दावा आहे की, भारतीय जनता पार्टी (भाजप) यावेळी स्वतःच्याच मित्रपक्षांना फोडण्याचा कट रचत आहे आणि लवकरच 'ऑपरेशन लोटस' राबवले जाऊ शकते.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपचा आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचा इतिहास आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच येत्या काही दिवसांत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळेल. पटोले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात कोणत्या पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.