Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'तू मला खुश कर, १० दिवस सुट्टी देतो!' जळगावमध्ये नराधम बॉसचा महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार; जमिनीवर पाडून अश्लील चाळे!

​'तू मला खुश कर, १० दिवस सुट्टी देतो!' जळगावमध्ये नराधम बॉसचा महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार; जमिनीवर पाडून अश्लील चाळे!


जळगाव: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील  अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आधी नाशिकमधील अशोक खरात प्रकरण पुढे आल्यानंतर, येथीलच एका आयटी कंपनीत महिलांवर दबाव टाकून लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

आता, जळगाव  जिल्ह्याच्या बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीतही अशाच प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी करत कर्मचारी महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जनार्दन नामक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर धरणगाव पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिती महिलेने तिच्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागितली असता अधिकाऱ्याने महिलेकडे शरिरसुखाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.


''तू खूप सुंदर आहे, मला तू आवडते, तू मला खुश कर, मी तुला दोन दिवस काय दहा दिवसाच्या सुट्ट्या देईन आणि पगारही कापणार नाही," असे म्हणून अधिकाऱ्याने पीडितेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला असता, अधिकाऱ्याने तिला कानशिलात लगावून जमिनीवर पाडले आणि अश्लील चाळे केले. माझ्या ओळखीचे गुंड आणि राजकारणी आहेत, जर तू कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,' अशी धमकीही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

अधिकाऱ्याने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून पीडितेला गप्प करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओची धमकी देत अधिकाऱ्याने पीडितेला कंपनीत कामासाठी ज्या नवीन मुली येतात, त्यांना तू मला खुश करण्यासाठी मनव, तू माझे हे काम केले तर मी तुला त्रास देणार नाही, असे काम करायला सांगितल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सात महिन्यांनंतर पीडितेने हिंमत एकवटून कुटुंबासह धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. 

त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप आरोपी अधिकाऱ्याला अटक झालेली नसून तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अण्णासाहेब घोलप यांनी म्हटलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.