Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका सेकंदात नशीब पालटलं! 'धुरंधर २' मुळे रातोरात स्टार झालेली 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?

एका सेकंदात नशीब पालटलं! 'धुरंधर २' मुळे रातोरात स्टार झालेली 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?


आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर द रिवेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. रिलीज होऊन 15 दिवस उलटले तरी सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांची गर्दी कमी झालेली नाही. सिनेमानं वर्ल्डवाइड 1400 कोटींपेक्षा जास्त कमाई करत नवा इतिहास रचला आहे.

सिनेमातील सगळ्याच कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. सिनेमातील प्रत्येक लहान मोठ्या कलाकारांची चर्चा होतेय. तुम्हाला माहिती का धुरंदर 2 मध्ये एक्त एक सेकंदांचा रोल करणारी ती अभिनेत्री? ती आता एका रात्रीत लाइमलाइटमध्ये आली आहे. कोण आहे ही सुंदरी? तिचा सिनेमातील एका सेकंदाचा तो सीन सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या चर्चेत अचानक एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. 'Dhurandhar 2'च्या क्लायमॅक्स सीनमध्ये रणवीर सिंह चार्टर्ड प्लेनमध्ये बसताना काही क्षणांसाठी एक एअर होस्टेस दिसते. हा सीन स्क्रीनवर अवघ्या 1 सेकंदासाठी दिसतो. मात्र याच छोट्याशा उपस्थितीमुळे अभिनेत्री नियती पारीख रातोरात चर्चेत आली आहे. या सीनमध्ये तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. पण ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता.

नियती पारीखने स्वतःच तिचा हा सीन सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "धुरंधर 2 मध्ये मला कोणी कोणी पाहिलं?" अनेकांनी तिचा सीन शोधण्यासाठी पुन्हा सिनेमा पाहिला. क्लिप व्हायरल होताच काही युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'मेन रोल तर तुमचाच होता', '10 रुपये मिळाले की 1000?' अशा कमेंट्स करत अनेकांनी तिची खिल्ली उडवली. मात्र दुसरीकडे अनेकांनी तिचं कौतुकही केलं.

नियतीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कळतंय ती एक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिला 2500 लोक फॉलो करतात. ती सोशल मीडियावरबरोबर अभिनय देखील करते. तिच्या अकाऊंटवर धुरंधर सिनेमातील अनेक कलाकारांबरोबरचे फोटो देखील आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.