Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धाराशिव हादरले! १२०० सिलेंडर्सचा काळाबाजार; ७ लाखांच्या व्यवहारामुळे वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न

धाराशिव हादरले! १२०० सिलेंडर्सचा काळाबाजार; ७ लाखांच्या व्यवहारामुळे वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न

धाराशिव : गॅसच्या स्टॉक आणि वितरणामध्ये तफावत असल्याने तणावाखाली आलेल्या गॅस वितरकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. ज्ञानेश्वर माळी असं गॅस वितरकाचं नाव असून कंपनीच्या तपासणीनंतर तो तणावाखाली होता.


या वितरकाने 1200 सिलेंडरचा घोळ घातल्याचं आणि तब्बल सात लाख किमतीच्या सिलेंडरची ब्लॅकने विक्री केल्याची चर्चा आहे. गॅस वितरकावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील डीलर ज्ञानेश्वर माळी याने तणावाखाली असल्याने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. गॅस कंपनीने त्याच्या एजन्सीची तपासणी केली होती. त्यामध्ये कंपनीला स्टॉक आणि वितरणामध्ये मोठी तफावत असल्याची माहिती समोर आली. गेल्या अनेक दिवसापासून या गॅस वितरकाकडे रिकव्हरी असल्याने त्याचा पुरवठाही बंद होता अशी माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी तामलवाडी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यात आखाती युद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यात डीलरने कंपनीच्या बैठकीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.