Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रीमती भारती चोपडे यांच्या नेतृत्वाखाली ‘कर्मवीर’ची प्रगती; २०.२१ कोटींचा नफा संपादन

श्रीमती भारती चोपडे यांच्या नेतृत्वाखाली ‘कर्मवीर’ची प्रगती; २०.२१ कोटींचा नफा संपादन


सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगलीस मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु. २० कोटी २१ लाखाचा ढोबळ नफा झाल्याचे व संस्थेच्या ठेवी, कर्जामध्ये उत्तम वाढ झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली.

संस्थेच्या मार्च २०२६ अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देत असताना संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये केलेल्या प्रगतीची आकडेवारी त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. आर्थिक वर्षात संस्थेने रु. २२७५ कोटींचा मिश्रव्यवसाय पूर्ण करून उत्तम कामकाज केले आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी रु. १२९६ कोटी झाल्या आहेत. तर संस्थेने रु. ९८० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची अन्य बँकातील गुंतवणूक रु. ५०५ कोटी अशी भक्कम आहे. संस्थेचा स्वनिधी रु. १५४ कोटी रुपयांचा आहे.

आर्थिक वर्षाअखेर संस्थेचे खेळते भांडवल रु. १५८० कोटी रुपयांचे आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेची सभासद संख्या ६९७२७ इतकी असून संस्थेकडे रु. ५९ कोटी रुपयांचे भागभांडवल जमा आहे. ढोबळ नफ्यातून ४ कोटी रुपयाच्या विविध तरतुदी करण्यात आल्या. तरतुदींनंतर संस्थेकडे रु. १६ कोटी २१ लाखाचा निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. निव्वळ नफ्यातून निधीसाठी विविध तरतूद होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होईल अशी माहिती चेअरमन यांनी दिली.

आर्थिक वर्षात सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचे चांगले योगदान मिळाले त्यामुळे संस्थेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करता आल्याचे चेअरमन यांनी सांगितले. सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम व संचालक मंडळ सदस्य आणि सेवक उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.