Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचा मोठा दावा: हिमंता सरमांच्या पत्नीकडे तीन देशांचे नागरिकत्व आणि दुबईत कोट्यवधींची मालमत्ता

काँग्रेसचा मोठा दावा: हिमंता सरमांच्या पत्नीकडे तीन देशांचे नागरिकत्व आणि दुबईत कोट्यवधींची मालमत्ता


नवी दिल्ली :- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नी रिनिकी यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट असून दुबईत त्यांच्या मालकीच्या दोन मालमत्ता आहेत. सरमा कुटुंबीयांच्या नावे अमेरिकेत 52 हजार कोटींची कंपनी आहे,' असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसने आज पुराव्यासह केला. 'सरमा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,' अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. काँग्रेसचे प्रवत्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे दाखवत सरमा कुटुंबीयांवर एका मागोमाग एक धक्कादायक आरोप केले. कागदपत्रांनुसार, रिनिकी सरमा यांच्याकडे यूएई, इजिप्त आणि अँटिग्वा-बारबुडा या देशांचे पासपोर्ट आहेत. हे सर्व पासपोर्ट अद्यापही वैध आहेत,' असे खेरा म्हणाले.

सरमा म्हणाले, कोर्टात खेचणार

पवन खेरा यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि खोटे असल्याची प्रतिक्रिया हिमंता सरमा यांनी दिली. खेरा यांच्या विरोधात 48 तासांच्या आत फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करणार, असे त्यांनी सांगितले.

तीन पासपोर्ट कशासाठी?

'हिमंता सरमा यांच्या पत्नीला तीन पासपोर्ट ठेवायची गरजच काय आहे? त्या गुन्हेगार आहेत का?, असा प्रश्न खेरा यांनी केला. पत्नीप्रमाणेच हिमंता यांच्याकडेही एकापेक्षा जास्त पासपोर्ट आहेत का हे समोर यायला हवे. निवडणूक हरल्यानंतर फरार होण्याचा याचा प्लान नाही ना,' अशी शंकाही पवन खेरा यांनी बोलून दाखवली. हिंदुस्थानात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नाही. त्यामुळे रिनिकी सरमा हिंदुस्थानी नागरिक आहेत का, असा सवालही खेरा यांनी केला.

असे का आणि कसे?
हिमंता सरमांचे संपूर्ण राजकारण मुस्लिम द्वेषावर आधारलेले आहे, पण त्यांच्या पत्नीकडे दोन मुस्लिम देशांचे पासपोर्ट आहेत, हे कसे?

हिंदुस्थानी कायद्याला दुहेरी नागरिकत्व मान्य नाही. मग रिनिकी सरमा यांच्याकडे हिंदुस्थानचा पासपोर्ट आजही आहे का?

हिमंता सरमा अमित शहा यांचे दत्तक पुत्र आहेत का? दत्तक पुत्राच्या पत्नीकडे तीन पासपोर्ट आहेत हे देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नव्हते का?

अमित शहा हे एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करणार का?

सरमा कुटुंबाची कंपनी व्योमिंगमध्ये का?

हिमंता सरमा, त्यांची पत्नी व मुलगा या तिघांच्या नावे अमेरिकेतील व्योमिंग राज्यात कंपनीची नोंद आहे. कागदपत्रांनुसार ही कंपनी 52 हजार कोटींची आहे. दोन दिवसांच्या चौकशीनंतर समोर आले की व्योमिंगमध्ये कर लागत नाही. तसेच, मालमत्तेची माहिती उघड केली जात नाही. त्यामुळेच सरमा कुटुंबीयांनी बनावट कंपन्यांसाठी ही जागा निवडली असावी, असे पवन खेरा म्हणाले. हे सगळे प्रकरण बघता हिमंता सरमा एकही दिवस तुरुंगाबाहेर राहता कामा नये, असे खेरा म्हणाले.

'सरमा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,' अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. काँग्रेसचे प्रवत्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे दाखवत सरमा कुटुंबीयांवर एका मागोमाग एक धक्कादायक आरोप केले. कागदपत्रांनुसार, रिनिकी सरमा यांच्याकडे यूएई, इजिप्त आणि अँटिग्वा-बारबुडा या देशांचे पासपोर्ट आहेत. हे सर्व पासपोर्ट अद्यापही वैध आहेत,' असे खेरा म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.