🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​पुणे हादरले! एकाच दिवसात ४ अल्पवयीन मुलींचे अपहरण; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

​पुणे हादरले! एकाच दिवसात ४ अल्पवयीन मुलींचे अपहरण; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.


पुणे : शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एकाच दिवशी चार अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या असून, विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चार अल्पवयीन मुलींचे अपहरण
विश्रांतवाडी परिसरातील एका १५ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेले. फुरसुंगीत १७ वर्षे आणि १६ वर्षे वयाच्या दोन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेले. तसेच, काळेपडळ परिसरातून अन्य एका १७ वर्षीय मुलीला पळवून नेण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.