Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"लग्नाच्या हॉलमध्ये नक्की काय घडत होतं?"लग्नाचा हॉल की रॅकेटचा अड्डा? ४० तरुण-तरुणींसह आक्षेपार्ह साहित्य जप्त; सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!

"लग्नाच्या हॉलमध्ये नक्की काय घडत होतं?" लग्नाचा हॉल की रॅकेटचा अड्डा? ४० तरुण-तरुणींसह आक्षेपार्ह साहित्य जप्त; सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!


लग्नाच्या हॉलमध्ये पोलीस आणि प्राशासकीय पथकाने छापा टाकला असता, धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. या छाप्यादरम्यान पोलिसांना लग्नाच्या हॉलमध्ये 40 तरुणी-तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. पोलिसांना पाहताच अनेक तरुण-तरुणींना घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज-डुंमराव रस्त्यावर असलेल्या प्रकाश मॅरेज हॉलमधील आहे.
लग्नाच्या हॉलवर कंडोम, उत्तेजक पदार्थ आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त खोल्यांमध्ये छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात कंडोम, उत्तेजक पदार्थ आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. मॅरेज हॉलमध्ये एक मोठं सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. संबंधित प्रकरण पाहता. पोलीस देखील थक्क झाले होते. अलीकडच्या काळात याच परिसरात मोठ्या प्रमाणात वैश्याव्यवसायाविरोधात कारवाई केली. एसडीएम प्रभात कुमार आणि एसडीपीओ सिंधू शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने शुक्रवारी हा छापा टाकला. नंतर लग्नसोहळ्यातील हॉलमध्ये दोन कार, एक ई-रिक्षा आणि 32 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

मॅरेज हॉल वैश्याव्यवसायाचे केंद्र

संबंधित प्रकरणात एसडीएमने सांगितलं की, मालिबागमधील प्रकाश मॅरेज हॉल हे वैश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून चालवले जात असल्याची माहिती त्यांनी मिळाली होती. त्याच्या आधारे, एसडीपीओ दावत, सीओ विकास कुमार पंडित, पोलीस निरीक्षक शेर सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले, त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मॅरेज हॉलवर छापा टाकण्यात आला.

आक्षेपार्ह अवस्थेत असलेले तरुण-तरुणी घटनास्थळावरून पळाले
पोलीस येताच हॉटेलचा मालक आणि त्याचे काही साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढण्यात यश मिळवले. दरम्यान, तीन मजली लग्नसोहळा समारंभाच्या हॉलमध्ये शिरताच आक्षेपार्ह अवस्थेत असलेले अनेक तरुण-तरुणीही पळून गेले. या प्रकरणी हॉलच्या मालकाविरुद्ध एफआरआय दाखल केला. तसेच या प्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाई केली, मॅरेज हॉल सील करण्यात आला आणि वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तरुण-तरुणींची कसून चौकशी करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.