Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजीता मोहपात्रा यांनी स्वीकारला सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार

संजीता मोहपात्रा यांनी स्वीकारला सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार


सांगली मिरज आणि कुपवाड शहरांच्या नव्या आयुक्त म्हणून संजीता मोहपात्रा यांनी आज आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्या यापूर्वी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांनी अमरावतीतही आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटविला होता.
संजीता मोहपात्रा या 2019 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या ओडिशा राज्यांतील आहेत. तर यापूर्वीचे आयुक्त सत्यम गांधी यांनी एप्रिल 2025 पासून आयुक्त पदावर काम पाहिले आहे. यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाल्याने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त पद हे रिक्त होते. सांगली मिरज आणि कुपवाड शहरांच्या महापालिकेच्या आयुक्त पदावर पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची इंट्री आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. 
नूतन आयुक्तांनी पदभार स्वीकारताच प्रशासनांच्या माध्यमांतून शहरातील कामांना गती मिळेल तसेच पालिकेत प्रशासकीय सुधारणा आर्थिक शिस्त आणि कामकाजातील पारदर्शकतेवर कायमच भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता नव्या आयुक्तांची इंट्री ही पालिकेतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धास्ती वाटण्यासारखी आहे. राज्य शासनाकडून झालेल्या बदल्यामध्ये अमरावती आणि सांगली अधिकाऱ्यांच्या फेरबदल अशा स्वरूपात बदल्या झाल्या आहेत. आज रोजी नूतन आयुक्तांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवुन नूतन आयुक्त संजीता मोहपात्रा यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.