कोल्हापुरात हनुमान जयंतीनंतर शिवाजी पेठेत पारंपरिक माही यात्रा (माही उत्सव) निमित्त मटण घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागली आहे. गॅस सिलेंडरनंतर आता मटणाच्या खरेदीसाठीही लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
शिवाजी पेठेतील माही परंपरेनुसार यंदा मटण ८०० रुपये किलो दराने विकले जात होते मात्र हे मटण नेहमीच्या बाजारभावाच्या तुलनेत (साधारण ६२० रुपये किलोपर्यंत) स्वस्त झाले आहे. दर्जेदार मटण मिळत असल्याने नागरिकांची गर्दी उसळली आहे. अनेक जण सकाळपासूनच रांगमध्ये उभे आहेत.
ट्रक भरून बकऱ्या आणण्यात आल्या असून, मटण विक्रीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. माही यात्रेच्या निमित्ताने ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून, कोल्हापूरकरांसाठी ही एक खास संधी मानली जाते. मटण प्रेमी नागरिक म्हणतात, "मिळणारं ताजं आणि चांगलं मटण घेण्यासाठी रांग लावणं काही नवीन नाही, पण यंदा गर्दी अधिक दिसत आहे." ही रांग पाहता कोल्हापूरकरांच्या मटणाविषयीच्या आवडीचं दर्शन घडत आहे.
तांबडा पांढऱ्याचा विषय हाय !
मटणाला तुटवडा नाय, अजून लागलं तर टेम्पो उभा आहे, तांबडा पांढरा मटणाचा विषय हाय!आजचं नाय तर हे दरवर्षीचं आहे , पहाटे पाच पासून रांगा लागत असतात अशी प्रतिक्रिया मटण खरेदीसाठी आलेल्या एका कोल्हापुरकराने दिली.1. माही यात्रा म्हणजे काय?माही यात्रा ही कोल्हापुरातील पारंपरिक उत्सव असून यामध्ये विशेषतः मटण खरेदीची परंपरा आहे.2. मटणाचा दर जास्त का आहे?दर्जेदार आणि ताज्या मटणामुळे तसेच उत्सवाच्या मागणीमुळे दर वाढले आहेत.3. लोक इतक्या मोठ्या रांगा का लावत आहेत?माही परंपरेनुसार ताजं आणि उत्तम मटण घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात.4. माही यात्रेत विशेष काय असतं?या दिवशी खास दर्जेदार मटण विक्रीसाठी आणलं जातं आणि ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे.5. मटण कुठून आणलं जातं?ट्रकभर बकऱ्या आणून त्याच ठिकाणी प्रक्रिया करून विक्री केली जाते.6. यंदा गर्दी जास्त का आहे?उत्सवाची वाढती लोकप्रियता आणि लोकांची मटणावरील आवड यामुळे गर्दी अधिक दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.