पिंपरी-चिंचवड: पोटच्या मुलीचा आवाज ऐकून आई खिडकीकडे धावली अन् काळजाचा ठोका चुकला; नराधमाचे संतापजनक कृत्य
पुण्यामध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशीमध्ये ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणाने या मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपी रामू कुंजल निसादविरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली. आरोपी रामू कुंजल निसादने शेजारी राहणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीला फूस लावत आपल्या घरामध्ये बोलावून घेतलं. यावेळी आरोपीने या मुलीवर बलात्कार केला. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही त्याने या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल अशी धमकी त्याने तिला दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेबद्दल कुणालाच काही सांगितले नाही.दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ एप्रिलला सकाळी त्याने या मुलीला पुन्हा घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या घरातून येत असलेला आवाज ऐकून पीडित मुलीची आई आणि आत्याने खिडकितून डोकावून पाहिले त्यावेळी आपल्या मुलीची अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास भोसरी पोलिस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.