Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळलं, म्हणूनच गरीब मरतायत"; राहुल गांधींचा घणाघात

​"मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळलं, म्हणूनच गरीब मरतायत"; राहुल गांधींचा घणाघात


जेव्हा अहंकारच धोरण बनतो तेव्हा अर्थव्यवस्था कोसळते, कामगार पलायन करतात, उद्योगधंदे उद्ध्वस्त होतात आणि देश अनेक दशके मागे जातो, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. राहुल गांधी देशातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून मोदींवर ट्विट करत हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले होते की ते एलपीजी गॅसचे संकट कोविडप्रमाणे हाताळतील आणि त्यांनी नेमके तेच केले, असा टोला लगावला आहे.

मजुरांसाठी गॅस परवडण्याजोगा राहिला नाही
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अगदी कोविडप्रमाणेच कोणतेही धोरण नाही, मोठ्या घोषणा आणि गरिबांवर बोजा होत आहे. ते पुढे म्हणाले की, दिवसाला 500-800 रुपये कमावणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी एलपीजी गॅस आता परवडण्याजोगा राहिलेला नाही. रात्री घरी परतणाऱ्या मजुरांकडे चूल पेटवण्यासाठीसुद्धा पैसे नसतात. याचा परिणाम: ते शहरे सोडून गावांमध्ये पलायन करतात. कापड गिरण्या आणि कारखान्यांचा कणा असलेले मजूरच आज उद्ध्वस्त होत आहेत.
सर्वात आधी गरीबच का मरतात?

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, कापड क्षेत्र आधीच आयसीयूमध्ये आहे. उत्पादन कोसळत आहे आणि हे संकट आले कुठून? राजनैतिक स्तरावर झालेली एक चूक, जी सरकार अजूनही मान्य करायला तयार नाही. त्यामुळे प्रश्न उरतोच, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? गप्प बसू नका. हा केवळ गरिबांचा प्रश्न नाही, तर हा आपल्या सर्वांचा प्रश्न आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.