Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांच्या मनमानीला चाप! खासगी मोबाईलने ई-चलान कापण्यास बंदी

पोलिसांच्या मनमानीला चाप! खासगी मोबाईलने ई-चलान कापण्यास बंदी


मुंबईच्या रस्त्यांसह महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांचे खासगी मोबाईलचा वापर करून ई-चलान कापण्याचे प्रमाण वाहतूक पोलिसांकडून सध्या वाढत आहे. भरसमसाट दंडाची भीती दाखवून वाहनचालकाकडून 'चिरीमिरी' घेणाऱया पोलिसांवर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

त्यासाठी राज्य सरकारने अभ्यास गट स्थापन केला आहे. राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करताना ई-चलान तयार करताना अनेक पोलीस खासगी मोबाईल वापरतात. तसेच संबंधित वाहनचालकाशी परस्पर तडजोड केली जाते. दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होत नाही. परिणाम सरकारचा महसूल बुडतो. त्यामुळे अशा खासगी मोबाईल पह्न वापरणाऱया संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी विधान परिषदेत केली होती. या मागणीच्या अनुषंगाने याबाबत अभयास करून निश्चित कार्यपद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शासन अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱयांविरोधात कारवाई करण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून त्या व्यक्तीचा एआय सारख्या तंत्रज्ञानाने मागोवा घेण्यात येणार आहे. नियमभंग करून पळणाऱया संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा होणार आहे. यासाठी वेगवेगळय़ा देशांतील किंवा राज्यांत याबाबत वापरल्या जाणाऱया आधुनिक पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महसूलवाढीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ई-चलानचा पोलिसांमार्फत गैरवापर होणार नाही याचादेखील अभ्यास करण्यात येईल. याकरिता गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱयांचा अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.