Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरे गटाला मोठा धक्का; फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडली

ठाकरे गटाला मोठा धक्का; फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडली


शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती हाती आली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीने कारवाई सुरू केली होती.
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरवात झाली होती. मागील वर्षी त्यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात आलं होतं. मागील काही महिन्यांपासून सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा हे समितीसमोर हजेरी लावत आहेत.

हक्कभंग समितीची उद्या गुरूवारी देखील सुनावणी होणार आहे. परंतु सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल असल्याने त्या उद्या होणाऱ्या हक्कभंग समितीच्य कारवाईसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती हाती आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून विधीमंडळाला पत्र पाठवण्यात येणार आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेमकं काय झालं?

सुषमा अंधारे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अंधारे यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली आहे का?

सुषमा अंधारे यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.