Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी!":, शिवाजी स्टेडियमचा कायापालट होणार; महापौरांचा 'मास्टरस्ट्रोक'

"सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी!":, शिवाजी स्टेडियमचा कायापालट होणार; महापौरांचा 'मास्टरस्ट्रोक'


सांगलीच्या क्रीडा संस्कृतीचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महापौर मा. श्री. धीरज सूर्यवंशी यांनी  सकारात्मक पाऊल उचलले आहे. आज महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खेळाडूंच्या अडचणी मांडल्या, ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जागेची पाहणी करण्याचे आणि आवश्यक ती मुदत वाढवून देण्याचे आश्वासक संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे स्टेडियमच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यामुळे सराव करणाऱ्या हजारो खेळाडूंची गैरसोय होत होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौरांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक खेळाडूंच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः छत्रपती शिवाजी स्टेडियमला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. क्रीडा उपक्रमांत खंड पडू नये यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर मुदतवाढीबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. हे मैदान सांगलीच्या क्रीडा परंपरेचा कणा असल्याने, इथल्या खेळाडूंच्या सरावात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असा ठाम निर्धार महापौरांनी व्यक्त केला.

महापौर धीरज सूर्यवंशी यांचे प्रतिपादन:
"छत्रपती शिवाजी स्टेडियम हे केवळ एक मैदान नसून सांगलीच्या अस्मितेचे प्रतीक आहे. इथल्या मातीत घडणाऱ्या खेळाडूंच्या हक्कासाठी मी शेवटपर्यंत कटिबद्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबतची चर्चा अत्यंत फलदायी ठरली असून, लवकरच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि खेळाडूंना हक्काचे मैदान पुन्हा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईल, असा मला ठाम विश्वास आहे." या भूमिकेतून महापौरांनी केलेल्या या प्रयत्नांचे क्रीडा प्रेमी आणि स्थानिक क्रीडा संघटनांकडून स्वागत होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.