Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"प्रेमविवाह झालेल्या महिलेचा १६ वर्षीय मुलावर अत्याचार; हॉटेलमध्ये भेटीनंतर घडला धक्कादायक प्रकार"

​"प्रेमविवाह झालेल्या महिलेचा १६ वर्षीय मुलावर अत्याचार; हॉटेलमध्ये भेटीनंतर घडला धक्कादायक प्रकार"


छत्तीसगड: एका २५ वर्षीय विवाहित महिलेने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने पीडित मुलाला हॉटेलमध्ये बोलावून त्याला इमोशनल ब्लॅकमेल केले आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्याती विश्वकर्मा (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगा आणि ख्याती यांची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. सुरुवातीला कधीतरी बोलणे व्हायचे नंतर या मैत्रीचे रूपांतर भेटीगाठींमध्ये झाले.

हॉटेलमध्ये बोलावले अन्...
पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, १ एप्रिल रोजी ख्यातीने त्याला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे पोहोचल्यानंतर महिलेने त्याला विविध प्रलोभने दाखवली आणि भावनिक दबाव टाकून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही तिने मुलाला दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगा प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. भीतीपोटी शांत राहिलेल्या पीडित मुलाने दोन दिवसांनंतर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ख्याती विश्वकर्माविरुद्ध 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली.
प्रेमविवाह झाला असूनही कृत्य सुरूच

तपासामध्ये समोर आले की, आरोपी महिलेने प्रेमविवाह केला होता. लग्नापूर्वीपासूनच ती या अल्पवयीन मुलाच्या संपर्कात होती. लग्नानंतरही तिने मुलाशी असलेले संबंध तोडले नाहीत आणि त्याला जाळ्यात ओढून हे कृत्य केले. सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.