महागड्या उपचारांची आता चिंता सोडा! सरकारी मदतीचा असा मिळवा लाभ; जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया.
मुंबई: कुटुंबात एखादे मोठे आजारपण आले की उपचारांच्या खर्चाने सामान्यांचे कंबरडे मोडते. पण आता घाबरण्याची गरज नाही! हृदयविकार, कॅन्सर किंवा किडनी ट्रान्सप्लांट सारख्या ११ गंभीर आजारांसाठी महाराष्ट्र सरकार भक्कम आर्थिक पाठबळ देत आहे. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' आणि इतर सरकारी योजनांचा लाभ नक्की कसा घ्यायचा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
आधी या योजनांचा विचार करा (प्राधान्य क्रमाने)
थेट मुख्यमंत्री निधीकडे धाव घेण्यापूर्वी सरकारने काही पायऱ्या निश्चित केल्या आहेत, जेणेकरून रुग्णाला तातडीने मदत मिळेल.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना: कोणत्याही उपचारासाठी सर्वात आधी या योजनेचा लाभ घ्या. नोंदणीकृत रुग्णालयात जाऊन जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधा. येथे अनेक उपचार पूर्णपणे मोफत होतात.
धर्मादाय रुग्णालये: तुमच्या जिल्ह्यातील चॅरिटी रुग्णालयांमध्ये काही खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव असतात. चॅरिटी इन्स्पेक्टर कार्यालयातून याची माहिती घेऊन तुम्ही सवलतीत उपचार घेऊ शकता.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम :- जर रुग्ण ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक असेल, तर या योजनेअंतर्गत विशेष मोफत उपचार मिळतात.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कधी आणि कोणाला मिळतो?
जेव्हा वरील कोणत्याही योजनेत उपचार बसत नाहीत, तेव्हा 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' मदतीला येतो.
या ११ गंभीर आजारांसाठी मिळते मदत
१. हृदयविकार२. कर्करोग३. मेंदूचे आजार४. किडनी प्रत्यारोपण५. यकृत प्रत्यारोपण६. हृदय प्रत्यारोपण७. बोन मॅरो ट्रान्सप्लांट८. डायलिसिस९. गंभीर अपघात१०. नवजात बालकांचे आजार११. इतर काही गंभीर शस्त्रक्रियाअर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रेमदत मिळवण्यासाठी तुमचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या अचूक असणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी सोबत ठेवा.उत्पन्नाचा दाखला: तहसीलदारांनी दिलेला (वार्षिक उत्पन्न १.६० लाख रुपयांपेक्षा कमी असावे).वैद्यकीय खर्चाचे कोटेशन: डॉक्टरांची सही आणि शिक्का असलेले अंदाजपत्रक.ओळखपत्र: आधार कार्ड आणि रेशन कार्डाची प्रत.वैद्यकीय रिपोर्ट: आजाराशी संबंधित सर्व चाचण्यांचे अहवाल.विशेष कागदपत्रे: अपघातासाठी FIR/MLC आणि प्रत्यारोपणासाठी ZTCC नोंदणी प्रमाणपत्र.
'या' चुका टाळा, अन्यथा अर्ज बाद होईल!
१. डिस्चार्ज नंतर अर्ज नको: रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असतानाच अर्ज करणे अनिवार्य आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर केलेला अर्ज ग्राह्य धरला जात नाही.
२. राज्याबाहेरील उपचार: मदत केवळ महाराष्ट्रातील रुग्णालयांसाठीच मर्यादित आहे. राज्याबाहेर उपचार घेतल्यास निधी मिळत नाही.
३. मर्यादित रक्कम: महात्मा फुले योजनेतून काही रक्कम मंजूर झाली असेल, तर उर्वरित खर्चाच्या केवळ ५०% रक्कमच या निधीतून मिळू शकते.
महत्त्वाची टीप
मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा मर्यादित असून तो अत्यंत गरजू रुग्णांसाठी आहे. त्यामुळे प्रथम इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. सर्व कागदपत्रे सुस्पष्ट PDF स्वरूपात ई-मेलद्वारे देखील सादर करता येतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.