बायको शिकली, मोठी झाली, पण संस्कार विसरली? ANM होताच पतीला घातली 'ही' अट; वाचा काय आहे संपूर्ण प्रकार
लखनऊ: ज्योती मौर्य आणि आलोक मौर्या सारखंच एक नवं प्रकरण समोर आलं आहे. ज्योती मौर्य यांनी एसडीएम होताच पतीला सोडल्याचा आरोप झाला. शिक्षणासाठी, सरकारी परिक्षेसाठी मदत करणाऱ्या पतीलाच सोडून गेल्यानं ज्योती मौर्य यांच्यावर टीका झाली.
यानंतर आता उत्तर प्रदेशातील गोंडातील एका मजूर तरुणानं अशाच प्रकारचा आरोप त्याच्या पत्नीवर केला आहे.
पाचवीपर्यंत शिकलेल्या तरुणानं त्याच्या पत्नीला एएनएमचा कोर्स (नर्सिंग कोर्स) करायला लावला. यानंतर तिला चांगली नोकरी मिळाली. नोकरी मिळताच पत्नीचे रागरंग बदलले. आता ती पतीसोबत राहण्यास तयार नाही. पत्नीनं सोबत राहण्यासाठी १० लाखांची मागणी केली आहे. माझ्या सोबत राहायचं असल्यास वृद्ध आई-बापाला सोडा, अशी संतापजनक अट तिनं घातली आहे.
लग्नानंतर पत्नीनं माहेरी राहून अभ्यास करायचा हट्ट धरला. आम्ही तिला परवानगी दिली. तिच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र मजुरी केली. म्हैस विकून शिक्षणासाठी आर्थिक जुळवाजुळव केली. आता एएनएम झाल्यावर ती मला टाळू लागली आहे. तिला माझ्या सोबत राहायचं नाही, अशी आपबिती राजेश कुमार वर्मा यांनी कथन केली. गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चपरतल्ला कौरहे गावात राहणाऱ्या राजेश कुमार याचं लग्न २००१ मध्ये रेणू वर्माशी ठरलं. रेणू पिपरा लालच गावची रहिवासी आहे.
लग्नाच्या वेळी रेणूचं वय १० वर्षे होतं. १७ वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर रेणू काही दिवस राजेश सोबत राहिली. या दरम्यान रेणूनं राकेशकडे एएनएम कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली. २०२२ मध्ये रेणू तिच्या गावी परतली. 'माहेरी गेल्यावर रेणूनं एएनएमला प्रवेश घेतला. त्यासाठी मी दिलेले पैंजण विकले. तिनं प्रवेश घेतल्यावर मी मदत करण्याचा निर्णय घेतला. पुढे मी पंजाबला गेलो. तिथे मजुरी केली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला,' असा घटनाक्रम राजेशनं कथन केला.
एएनएम कोर्स केल्यावर रेणूला गोंडातील एका रुग्णालयात नोकरी लागली. यानंतर तिनं माझ्या सोबत नकार दिल्याचा आरोप राजेशनं केला. 'आई-बापाला सोड आणि गोंडामध्ये वेगळा राहा, यासाठी पत्नी आणि सासरचे दबाव टाकत आहेत. तसं करायचं नसल्यास १० लाख रुपये देऊन समझोता करण्यास सांगत आहेत,' असा दावा त्यानं केला.
वडिलांची मानसिक स्थिती ठीक नाही. आईची दृष्टी गेली आहे. त्यामुळे अशा अवस्थेत आई, वडिलांना सोडू शकत नाही, असं राजेश म्हणाला. पत्नीच्या शिक्षणासाठी बराच खर्च केला. ३५ हजारांत दोन म्हैशी विकल्या. ऊस विकून तिला ६० हजार पाठवले. पण आता ती सोबत राहण्यास तयार नसल्याचं सांगताना राजेशचे डोळे पाणावले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.