Big Breaking! जमिनीच्या वादातून साऊथ स्टाईल थरार! ६ जणांना भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं, रस्ता रक्ताने माखला; मन विचलित करणाऱ्या हत्याकांडाने देश हादरला!
विजापूर: जमिनीच्या तुकड्यासाठी नाते सुद्धा लोक विसरत चालली आहे. जमिनीच्या वादातून घराघरात वाद आणि तंडे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यात एका गावात ६ जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हे हत्याकांड इतकं भीषण होतं की, गावातील रस्त्यावरच एकाच वेळी ६ जणांचा मृतदेह पडलेले होते. अंगावर शहारे आणणारी ही घटना जमिनीच्या वादातून घडली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी संध्याकाळी हे हत्याकांड घडलं. या घटनेत सहा जणांची हत्या कऱण्यात आली. रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार अशी मृतांची नाव आहे. यामध्ये बाप आणि लेकांचाा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात संध्याकाळी हे हत्याकांड घडलं. अज्ञात हल्लेखोर गावात आले आणि त्यांना निराळे कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घरापासून जवळच शेतात ६ जण आढळलं. यावेळी या टोळक्याने ६ जणांवर गोळीबार केला. तर काही जणांवर कोयत्याने भीषण हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, काहींचे हात छाटले गेले तर काहींचा चेहरा तोडण्यात आला. या भयानक हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जमिनीच्या वादातून हत्याकांड
गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये मागील अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. या सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.